IPL 2025चा थरार 22 मार्चपासून रंगणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी ।। आयपीएल २०२५ (IPL 2025), २२ मार्चपासून सुरू होईल. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RRB) त्यांच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर होणार आहे. अंतिम सामनाही २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. आयपीएलचा पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये रंगणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

या हंगामात गुवाहाटी आणि धर्मशाळा येथेही सामने खेळवले जातील. राजस्थान २६ आणि ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळेल. पंजाब किंग्ज त्यांचे काही घरचे सामने धर्मशाळेत खेळतील. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर हैदराबादमध्ये तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना कोलकातामध्ये होईल. इतर सामने अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, लखनऊ, मुल्लानपूर, दिल्ली आणि जयपूर येथे खेळवले जातील. क्रिकबझच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

वेळापत्रक लवकरच जाहीर होऊ शकते
गेल्या काही दिवसांपासून चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत होते. बीसीसीआयने (BCCI) अधिकृतपणे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परंतु अनधिकृतपणे, बोर्डाने फ्रँचायझींसोबत मुख्य सामन्यांच्या तारखा शेअर केल्या आहेत. १२ जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी २३ मार्चपासून आयपीएल सुरू होईल असे संकेत दिले होते. पण आता बीसीसीआयने तारखा बदलल्याचे ज्ञात आहे. संपूर्ण वेळापत्रक एक-दोन दिवसांत येण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *