महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ।। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. अपात्र झालेल्या जवळपास ९ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्थ खात्याकडून ३४९० कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून खटाखट १५०० रूपये जमा होणार आहेत.
तीन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्याच्या दैौऱ्यावर अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात आठ दिवसांत पैसे येतील,असे संकेत दिले होते. आता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्याआधी फेब्रुवारीचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील.