Alert: माथेरान- महाबळेश्वरमध्ये वाढला उष्मा, मुंबईत यलो अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. २४ फेब्रुवारी ।। देशभरात होणाऱ्या हवामान बदलांचे परिणाम बहुतांश राज्यांमध्ये दिसत, असून राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात; तिथं दक्षिणेकडे केरळ, तामिळनाडूमध्येही तापमानवाढ सुरू झाली असून हा उष्मा नागरिकांच्या डोक्याचा ताप आणखी वाढवताना दिसत आहे. महाराष्ट्रात एकिकडे उकाडा भीषण पद्धतीनं वाढत असतानाच मध्येत कोकणाला गारपीटीनं तडाखा दिल्यानं आंबा आणि काजू बागायतदारांपुढं नवं संकट उभं राहिलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार गारपीटीचं हे सत्र आता शमलं असलं तरीही वातावरणात दमटपणा वाढणार असून, त्यामुळं सूर्याची दाहकता आणखी भासणार आहे. राज्यात विदर्भाप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी इथं तापमानाचा सर्वाधिक आकडा नोंदवण्यात आला असून, हा आकडा 38.4 अंश सेल्सिअस असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामानाची ही एकंदर स्थिती पाहता कोकणाह मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा कमाल तापमानात वाढ झाली असून, त्यामुळं ही थंड हवेती ठिकाणं नावापुरताच उरली असल्याची स्थिसी सध्या निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यात सध्या माथेरान इथं तापमानाचा आकडा 36 अंश इतका असून, साताऱ्यातील महाबळेश्वर इथं दुपारच्या वेळचं तापमान 32 अंशांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळं सूर्याच्या या तप्न लहरींनी अख्खा महाराष्ट्र होरपळत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.

मुंबईत उन्हाचा दाह सोसेनासा होणार
मागील काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा ताप आणखी वाढताना दिसत आहे. मंगळवारपर्यंत शहरातील तापमानाच आणखी वाढ होणार असून, तापमानातील वाढीसमवेत वाढत्या आद्रतेमुळे उष्मा आणखी जाणवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आणखी काही दिवस शहरातील उष्मा कायम राहणार असून, तो दिवसागणिक वाढतच जाईल त्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *