Champions Trophy 2025: इंग्लंड-अफगाणिस्तान ला आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय हवाच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये उद्या (ता. २६) चॅम्पियन्स करंडकातील ब गटातील महत्त्वपूर्ण लढत रंगणार आहे. दोन्ही देशांना पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंड व अफगाणिस्तान या देशांना विजय आवश्‍यक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्यांना ३५१ धावांचा बचाव करता आला नाही. फिल सॉल्ट व हॅरी ब्रुक या दोन फलंदाजांचे अपयश त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. फिल सॉल्ट याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अखेरचे शतक २०२२मध्ये लगावले आहे. फिल सॉल्ट ३० ते ४० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतत आहे. हॅरी ब्रुकचीही तीच अवस्था आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हॅरी ब्रुककडून धावांचा पाऊस पडला होता; पण भारतातील मालिकेपासून त्याच्या बॅटमधून धावाच होत नाहीत.

इंग्लंडच्या संघाला सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियन संघाकडून हार पत्करावी लागली. या लढतीमध्ये आणखी एक वाईट बाब त्यांच्यासाठी घडली. ब्रायडन कार्स याला दुखापत झाली. यामुळे त्याला या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याऐवजी लेगस्पिनर रेहान अहमद याची इंग्लंड संघात निवड करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *