महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। मुंबई प्र 26 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेमाचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन करीत असतात याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर कार्यकर्ते दादासाहेब शिरोळे यांनी आपल्या रक्ताचा उपयोग करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे चित्र तयार केले.
हा अनोखा सन्मान देण्यासाठी दादा शिरोळे तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची पिंपरी येथे भेट घेतली आणि त्यांना स्वतःच्या रक्ताने तयार केलेले चित्र सुपूर्द केले. याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह वाढला असून पक्षनिष्ठेचे अनोखे उदाहरण पिंपरी चिंचवड येथे पाहायला मिळाले या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे व पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते