‘ कृष्णा आंधळेला आणतो ‘ पैसे दिले, वाट पाहिली, पण… ; आमदार धसांना गंडा घातला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी ।। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अजूनही यश मिळालं नाही. मात्र कृष्णा आंधळेसाठी आमदार सुरेश धसांना ५ हजारांचा गंडा घालण्यात आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि धसांना गंडा कसा घातला? पाहूयात या.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तब्बल गेल्या ८० दिवसांपासून फरार आहे आणि पोलीस शोध सुरू आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. कृष्णा आंधळेला घेऊन येतो, असं सांगून बारगजे नावाच्या व्यक्तीने आपल्याला गंडा घातल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय. तर कृष्णा आंधळे छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याचं सांगत खासदार बजरंग सोनवणेंचीही फसवणूक केली असल्याचं समोर आलंय. या बारगजेने धसांना कसा गंडा घातला? पाहूयात.

कसा घातला धसांना गंडा?

बारगजे नावाच्या व्यक्तीचा आमदार सुरेश धसांना फोन

आंधळेला कॅबमधून आणण्यासाठी बारगजेकडून पैशांची मागणी

धसांनी बारगजेला ५ हजार पाठवले

आपल्याला साडेचार तास अहिल्यानगरमध्ये उभं रहावं लागल्याचा दावा

त्यानंतर धसांनी पोलीस अधीक्षकांना फोन केला

पोलीस अधीक्षकांनी आपलीही फसवणूक झाल्याचं सांगितलं, असा धसांचा दावा

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातून वेगवेगळ्या प्रकारचा लाभ उठवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचं धसांनी म्हटलं आहे. धसांना गंडा घालणाऱ्या बारगजे या व्यक्तीचा माग पोलीस काढत आहेत. मात्र आमदार आणि पोलीस अधीक्षक यांचीच जर अशी फसवणूक होत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील? याची फक्त कल्पनाच केलेली बरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *