गाडेचे राजकीय कनेक्शन? शिरूरच्या आजी-माजी आमदारांनी केला खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी ।। शिरूर-हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासोबत आरोपी दत्तात्रय गाडे याचे फोटो असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपीवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा रंगल्यानंतर शिरूरच्या आजी-माजी आमदारांनी आरोपीशी कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा व्हिडीओद्वारे केला आहे.

आमदार माऊली कटके यांचा फोटो आरोपी दत्तात्रय गाडे याच्या डीपीवर असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्याशी संबंधित एका फ्लेक्सवर आरोपी गाडेचा फोटो देखील दिसून आला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार माऊली कटके यांनी एका व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, आरोपी हा शिरूर तालुक्यातील राहणारा असल्याचे मला समजले. शिरूर-हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे अनेकजण येत असतात. फोटो काढत असतात, भेटत असतात. या व्यक्तीशी आपला काही संबंध नाही. घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक आणि वेदनादायक आहे. विकृती असलेल्या व्यक्तीचा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

तर, माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले की, हा आरोपी उज्जैन येथे महिला भगिनींना नेण्यासाठी कोणाला मदत करत होता? याची सखोल चौकशीही पोलिसांनी केली पाहिजे. याचे हितसंबंध पोलिसांनी शोधले पाहिजेत. मोबाईल ताब्यात घेणे, उज्जैनला गेला त्या वेळचे रेकॉर्ड मागितले पाहिजेत. अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.

आरोपीला अटक करून हा आरोपी कोणा कोणाच्या घरी जात होता? त्याचे हितसंबंध कोणाशी जोडले होते, ते शोधणे गरजेचे आहे. त्या हितसंबंधांवरही कडक कारवाई करण्यात येते का? याचा देखील शोध पोलिसांनी शोध घेतला पाहिजे, असे म्हणत पवार यांनी आरोपीबरोबर कोणताही संबंध नसल्याबाबत खुलासा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *