iPad Launch : अ‍ॅपलचा नवा iPad Air आणि 11th Gen iPad भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत,फीचर्स अन् सर्व डिटेल्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. ५ मार्च ।। अ‍ॅपलने आपला बहुप्रतीक्षित 11व्या जनरेशनचा iPad आणि iPad Air (2025) भारतात लॉन्च केला आहे. नवीन iPad Air मध्ये अ‍ॅपलचा M3 चिपसेट देण्यात आला आहे, तर 11th Gen iPad A16 बायोनिक चिप सह अपग्रेड करण्यात आला आहे. या नव्या डिव्हाइसेसची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

iPad Air (2025) आणि 11th Gen iPad ची भारतातील किंमत

11-इंच Wi-Fi मॉडेल: 59,900 रुपये

11-इंच Wi-Fi + Cellular मॉडेल: 74,900 रुपये

13-इंच Wi-Fi मॉडेल: 79,900 रुपये

13-इंच Wi-Fi + Cellular मॉडेल: 94,900 रुपये

कलर ऑप्शन्स: ब्लू, पर्पल, स्पेस ग्रे आणि स्टारलाईट

Wi-Fi मॉडेल: 34,900 रुपये

Wi-Fi + Cellular मॉडेल: 49,900 रुपये

कलर ऑप्शन्स: ब्लू, पिंक, सिल्व्हर आणि यलो

नव्या iPad साठी कीबोर्डची किंमत

iPad Air साठी Magic Keyboard (11-इंच): 26,900 रुपये

iPad Air साठी Magic Keyboard (13-इंच): 29,900 रुपये

iPad (2025) साठी Magic Keyboard Folio: 24,900 रुपये

नव्या iPad साठी प्रि-ऑर्डर सुरू असून, मार्च 12 पासून हे डिव्हाइसेस विक्रीसाठी उपलब्ध होतील.

iPad Air (2025) काय नवीन?

नवीन M3 चिप, जी पूर्वीच्या M1 चिपपेक्षा दुप्पट वेगवान आहे.

iPadOS 18 सह काम करते, तसेच काही Apple Intelligence वैशिष्ट्यांना सपोर्ट करते.

11-इंच आणि 13-इंच Liquid Retina डिस्प्ले पर्याय.

12MP रियर आणि 12MP फ्रंट Center Stage कॅमेरा.

Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.3 सपोर्ट.

GPS, 5G आणि 4G LTE सपोर्ट (Wi-Fi + Cellular मॉडेल्ससाठी).

28.93Wh बॅटरी (11-इंच) आणि 36.59Wh बॅटरी (13-इंच), जी 10 तासांपर्यंत बॅकअप देते.

11th Gen iPad (2025) काय अपग्रेड झाले?
नवीन A16 Bionic चिप, जी A14 Bionic चिपपेक्षा 30% वेगवान आहे.

128GB स्टोरेज – जुन्या 64GB मॉडेलपेक्षा मोठे अपग्रेड.

12MP रियर आणि 12MP फ्रंट कॅमेरा (Center Stage सपोर्टसह).

Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.3 सपोर्ट.

GPS, 5G आणि 4G LTE सपोर्ट (Wi-Fi + Cellular मॉडेल्ससाठी).

28.93Wh बॅटरी, जी 10 तासांपर्यंत बॅकअप देते.

अ‍ॅपलच्या या नव्या iPad मॉडेल्समध्ये दमदार प्रोसेसर, जास्त स्टोरेज, उत्कृष्ट कॅमेरे आणि नवीन Magic Keyboard चा सपोर्ट आहे. अधिक पॉवरफुल आणि जलद परफॉर्मन्सच्या शोधात असलेल्या युजर्ससाठी हा iPad Air (2025) उत्तम पर्याय ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *