जगातील सर्वांत मोठ्या पगडी ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अॅण्ड जिनिअस’ मध्ये होणार नोंद
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगातील सर्वांत मोठ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळादि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी पार पडणार आहे. याप्रसंगी विशेष उपस्थिती ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अॅण्ड जिनिअस फाऊंडेशन’चे सीईओ पवनकुमार सोलंकी आणि ‘संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट’ श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम मोरे यांची राहणार आहे, तर संकल्पना व आयोजन ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’ यांनी केले आहे.
दिलीप सोनिगरा म्हणाले की, “जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन झालेल्या नगरीमध्ये आम्ही वास्तव्य करत असून याच
परिसरात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात स्थिर झालो आहोत. तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा, प्रेम आणि स्नेह आहे. याच सद्भावनेतून आम्ही जगातील सर्वांत मोठी पगडी तयार केली असून ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया अॅण्ड जिनिअस बुक’मध्ये हिची नोंद होणार आहे. सदरील पगडीचा घेराव हा २२ फुटांचा असून पगडीची उंची चार फूट आहे, तर पगडीला ४५० मी. लांबीचे कापड लागले आहे. सदरील पगडी दर्शनासाठी दि.१० मार्च रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत ‘दिलीप सोनिगारा ज्वेलर्स’ चिंचवड येथे ठेवण्यात येणार आहे. सदरील पगडी पाहण्यासाठी व दर्शनासाठी सर्वांसाठी खुली आहे. तरी जास्तीत जास्त पिंपरी-चिंचवडकरांनी याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन दिलीप सोनिगरा यांनी केले आहे.