महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १४ मार्च ।। पिंपरी चिंचवड: गुरुकुल नर्सरी प्राधिकरण आणि गुरुकुल बालभवन यांच्या वतीने बाल गोपलांसाठी होळी व धुळवड कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला.. यावेळी बालभवन व नर्सरी च्या सर्व बालकांचा सहभाग होता..
कोणता सण कसा साजरा करतात ,त्या मागे शास्त्रीय अध्यामिक कारण काय हे लहान मुलांना लहान वयात कळणे महत्वाचे आहे, गेले ३१ वर्ष पासून गुरुकुल बालभवन गुरुकुल नर्सरी च्या माध्यमातून आम्ही विविध सण साजरे करत मुलांना त्याचे महत्व समजवून सांगतो असे मनोगत संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष हेमांगी वारे यांनी व्यक्त केले..