होळीनंतर शुक्र होणार अस्त, ‘या’ पाच राशींचे चमकणार नशीब

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १४ मार्च ।। मार्च महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात मोठ्या ग्रहांची युती निर्माण होणार आहे. तसेच काही ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. विशेषत: होळीनंतर ग्रहांच्या स्थितीमध्ये मोठे बदल दिसून येईल. होळीचा पर्व या वर्षी १४ मार्चला साजरा केला जात आहे आणि त्यानंतर १९ मार्च रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या जवळ जात असल्याने मीन राशीमध्ये अस्त होणार आहे आणि पुन्हा २३ मार्च रोजी उदित होणार आहे.

या खगोलीय परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येईल ज्यामध्ये काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्यांचे नशीब चमकू शकते.

मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे. प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक आणि दांपत्य जीवना गोडवा दिसून वाढेन. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग दिसून येईल प्रवासाचे संयोग निर्माण होऊ शकतात.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन लाभदायक ठरू शकते. अडकलेले कामे पूर्ण होतील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. धन संपत्तीमध्ये वृद्धी होईल. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. सासरचे लोकांपासून आर्थिक सहकार्य मिळेल. आईवडिल आणि भावाचे समर्थन मिळेल.

मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांवर शुक्राची विशेष कृपा दिसून येईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे आगमन होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. नशीबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते तसेच नवीन नोकरीची संधी मिळू शकते.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी या दरम्यान शुभ फळ प्राप्त होईल. घरात सुख शांती आणि आनंद दिसून येईल. व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो. जुन्या आजारातून हे लोक बरे होतील. अविवाहित लोकांना शुभ वार्ता मिळू शकते.

कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा वेळ अत्यंत फायदेशीर आहे. व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकतो. समाजात मान सन्मान वाढणार धनलाभाचे योग जुळून येईल कौटुंबिक जीवनात सुख प्राप्त होईल. अचानक प्रवासाचे योग जुळून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे अचूक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *