स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळाला जाग, ‘त्या’ 72 बसेस भंगारात विकणार, ‘या’ दिवशी होणार लिलाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. १५ मार्च ।। पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये (Swargate Bus Depot) २५ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली आहे. जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरूस्त अशा निकामी झालेल्या एकूण 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे.

पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात ‘एसटी’ महामंडळाच्या 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत. या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून बसमधील साहित्याची चोरीसारख्या घटना घडल्या आहेत. तर 25 फेब्रुवारी रोजी स्वारगेट डेपोमध्ये उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता.

21 मार्चला होणार बसेसचा लिलाव

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली आहे. जुन्या, मुदत संपलेल्या आणि नादुरूस्त अशा निकामी झालेल्या एकूण 72 ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे. येत्या 21 मार्च रोजी या 72 बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे. या नादुरूस्त बसच्या माध्यमातून 2.50 ते 3 कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

100 बस थांबे संवेदनशील म्हणून निश्चित
दरम्यान, पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 14 आगारांतर्गत असणाऱ्या 42 बसस्थानकांच्या हद्दीतील 100 बस थांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपाययोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात. हे प्रवासी रात्री- अपरात्री महामार्गांलगत असणाऱ्या एसटी थांब्यावर बस थांबून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *