महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १९ मार्च ।। पाकिस्तानमधील सर्वात उंच व्यक्ती नसीर सूम—ो यांचे नुकतेच निधन झाले. तब्बल 7 फूट 9 इंच उंची असलेल्या या माणसाने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ते 55 वर्षांचे होते आणि दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने आणि सांधेदुखीच्या समस्यांनी त्रस्त होते. नसीर सूम—ो यांनी आपल्या शिकारपुर (सिंध, पाकिस्तान) या गावी अखेरचा श्वास घेतला. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नसीर सूम—ो यांची उंची असामान्य म्हणजेच 7 फूट 9 इंच होती. सामान्य माणसाच्या तुलनेत ते तब्बल 3 फूट अधिक उंच होते. त्यांच्या या असामान्य उंचीमुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. नसीर सूम—ो पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स मध्ये कर्मचारी होते. त्यांची विशेष प्रतिष्ठा लक्षात घेता त्यांना येथे नोकरी मिळाली. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांना सरकारकडून आणि संस्थेकडून फारसा आधार मिळाला नाही. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. सूम—ो यांच्या कुटुंबीयांच्या मते, त्यांना फुफ्फुसांच्या आजारामुळे अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तब्येत सतत खालावत असली, तरीही त्यांनी आपले जीवनसंग्राम सुरूच ठेवला. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी नसीर सूम—ो यांच्या निधनावर गंभीर शोक व्यक्त केला. त्यांनी सूम—ो यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती दर्शवली आणि जागतिक स्तरावर पाकिस्तानला ओळख मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.