महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ मार्च ।। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला. यादरम्यान बीडमधील मारहाणीचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. हेच नाही तर बीडच्या आकानंतर खोक्याचेही व्हिडीओ व्हायरल झाली. आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याचे मारहाणीचे व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. खोक्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले. बीडमधील अनेक आका, खोक्या पुढे आल्यानंतर आता सोलापूरातील नाईन्ट्याचे कारनामे पुढे आले.
सोलापूरच्या रामलाल चाैकात प्रजा मटन स्टॉलजवळ काही लोक गोंधळ घालत होते. यावेळी नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे हा स्वत: हून फुटपाथवर डोके आणि तोंड आदळून घेत होता. यावेळी त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता आणि रक्तस्त्रावही होत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिस हवालदार दिनेश घंटे हे नाईन्ट्याला घेऊन जात होते. यावेळी त्याने पोलिस हवालदाराच्या अंगावर थुंकत मारहाण केली.
हिंसाचाराच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक, मुख्य सूत्रधाराचा जामिनासाठी अर्ज
हेच नाही तर दिनेश घंटे यांचे शर्ट पकडून तो मारत होता. पोलिस ठाण्यात नेल्यानंतरही परत एकदा दिनेश घंटे यांच्या अंगावर थुंकून त्यांना नाईन्ट्याने मारहाण केली. यावेळी मोठा गोंधळ झाला. नाईन्ट्याला शांत राहण्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले असता नाईन्ट्याने त्यांना देखील मारहाण केली. अरविंद माने यांच्या छातीत त्याने बुक्की मारली. तो पोलिस ठाण्यात गोंधळ घालत होता. या प्रकारानंतर नाईन्ट्याच्या विरोधात फाैजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेच नाही तर महिलेची छेडछाड आणि तिच्या मुलाला आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणीही नाईन्ट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी नाईन्ट्याला सुनावली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. बीडच्या खोक्याची चर्चा असतानाच सोलापूरचा हा नाईन्ट्या चर्चेत आहे. त्याची दादागिरी इतकी जास्त वाढली की, त्याने थेट पोलिसांवर हात उचलला.