Gold Price Today : सोने चांदीच्या दरात मोठी घसरण ; गुढीपाडव्यापूर्वी बाजारात उत्साह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ मार्च ।। रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या गेल्या काही वर्षापासूनच्या युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात दररोज वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या रशिया आणि युक्रेंच्या युद्ध थांबण्याच्या करारामुळे जळगावच्या सुवर्णनगरी देखील परिणाम पाहायला मिळाला.

राज्यात प्रचलित असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या दोन दिवसापूर्वी उच्चाकी गाठलेला सोने आणि चांदीचा दर आज पुन्हा कमी झाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या दर कमीमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत ग्राहकांची गर्दी पहावयास मिळत आहे. एकीकडे लग्नसरायची धामधूम सुरू असताना सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहक सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी आल्याचे दिसून येत आहे.

आज आंतरराष्ट्रीय बाजाराच्या चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी सोने व चांदी दोन्हीच्या दरात घसरण झाली. सोने 500 रुपयांनी तर चांदी 2100 रुपयांनी खाली आली आहे.आज सोन्याचा दर हा 88200 तर चांदीचा भाव 98000 हजारांवर आला असल्याने ग्राहकांची गर्दी जळगावच्या सुवर्णनगरीत पहावयास मिळत आहे.

सोनं-चांदी खरेदी करण्याऱ्यासाठी ही वेळ उत्तम आहे. गुढीपाडव्याचा सण अगदी काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. अशातच मागच्या काही महिन्यांपासून सोने चांदीच्या दरात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत होतं. सोनं-चांदी खरेदीची किंमत लाखोंचा अंक गाठतेय की काय? अशी अनेकांना भिती वाटत होती. मात्र गेल्या २ ते ३ दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३९० रुपयांनी घट झाली तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत आता ८,९९,८०० रुपये इतकी आहे. हाच दर मुंबई, पुणे, जळगावमध्ये असणार आहे. तर चांदी १ ग्रॅम १०३ रुपयांना असेल. तर १०० ग्रॅम १०,३०० रुपयांना असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *