महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. २४ मार्च ।। केंद्र सरकारने नागरिकांसाठी रेशन कार्ड सेवा सुरु केली आहे. रेशन कार्डद्वारे गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये जीवनावश्यक वस्तू मिळतात. यामध्ये धान्य, तेल मिळते. या गोष्टी मिळण्यासाठी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. रेशन कार्डवर धान्य घेण्यासाठी आता केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही.
रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. परंतु सध्या ई केवायसी करण्याच्या नावावर फ्रॉड होत आहेत.त्यामुळे केवायसी करताना काळजी घ्यायची असते. (Ration card KYC)
केवायसीच्या नावावर फ्रॉड
भारत सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. परंतु याचा गैरफायदा काही फ्रॉड लोक घेत आहेत. यासाठी अनेकजण कॉल करुन तुम्ही केवायसी करा अन्यथा तुमच्या सर्व सुविधा बंद होतील, असं सांगत आहेत. परंतु अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
फ्रॉडपासून कसा बचाव कराल
जर तुम्हाला रेशन कार्ड केवायसीसंदर्भात कोणताही फोन आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करु नका. रेशन कार्डच्या ई केवायसीसंदर्भात कोणत्याही प्रकारची लिंक सरकार पाठवत नाही. त्यामुळे अशा मेसेज किंवा कॉलरवर लक्ष देऊ नका. तुम्ही या नंबरला लगेचच ब्लॉक करा. किंवा सायबर क्राइम पोर्टलवर जाऊन तक्रार करु शकतात. जर तुम्ही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक केले तर तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून घेतले जाऊ शकतात.
जर तुम्हाला केवायसी करायचे असेल तर ऑनलाइन पद्धतीने करु शकतात. याचसोबत तुम्ही रेशनच्या दुकानावर जाऊनदेखील केवायसी करु शकतात. यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. तुम्ही आधार कार्ड घेऊन रेशन दुकानावर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे फिंगरप्रिंट स्कॅन केले जाईल. त्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.