महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३१ मार्च ।। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी आली होती. या दिवशी अनेकजण सोन्याची खरेदी करतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढताना दिसतोय. मात्र गुढीपाढव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोन्याचा भाव उतरला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं.
Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज ३१ मार्च रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,13,400 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,374 रुपयांना मिळेल.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोनं 9,134 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,359 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,119 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,359 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,119 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,359 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,119 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,359 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,119 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,359 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,119 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,428 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,194 रुपये