![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. आजपासून पैशांसंबधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामध्ये बँकेच्या काही नियमांचा समावेश आहे. बँकेच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. बँकेच्या या नियमांमुळे महिन्याच्या बजेटवर परिणाम होणार आहे. एटीएमपासून ते यूपीआयपर्यंत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.
ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार शुल्क (ATM Withdrawl)
रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. आता तुम्ही फक्त काही लिमिटपर्यंतच एटीएममधून कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक व्यव्हारासाठी २० ते २५ रुपये द्यावे लागणार आहे.
बचत खात्यात किमान रक्कम (Minimum Amount In Saving Account)
आता तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. प्रत्येक बँकेची लिमिट ही वेगवगेळी असते. त्यामुळे तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागणार आहे नाहीतर दंड भरावा लागेल.
पॉझिटिव्ह पे सिस्टीम (Positive Pay System)
आता तुम्हाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे काढायची असेल तर त्याची माहिती आधीच बँकेला द्यावी लागणार आहे. बँकांनी त्यांच्या व्यव्हारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
डिजिटल बँकिंग फीचर
आता डिजिटल बँकिंमध्ये एआय असिस्टंटचा वापर केला जाणार आहे. यामुळे डिजिटल व्यव्हार अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.
एफडी आणि बचत खात्यावर व्याजदर
१ एप्रिलपासून एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात बदल होऊ शकतो. स्टेट बँक, आयडीबीआय, एचडीएफसी बँक त्यांच्या व्याजदरात बदल करु शकतात.कदाचित हे व्याजदर वाढू शकतात किंवा कमीदेखील होऊ शकतात.
क्रेडिट कार्डचे नियम (Credit Card Rule)
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डवरील अनेक फायदे आता संपणार आहेत. तुम्हाला याआधी अनेक रिवॉर्ड, कॅशबॅक सुविधा मिळत होत्या. आता या सुविधा मिळणार नाहीत.
यूपीआय (UPI Rule)
आता काही यूपीआय अकाउंट्स बंद होणार आहे. ज्या नागरिकांना अनेक दिवसांपासून यूपीआय अकाउंट वापरले नाही त्यांचे अकाउंट्स बंद केले जाणार आहेत. तुमचा फोन नंबर लिंक असेल पण तुम्ही यूपीआय वापरत नसाल तर तुमचे सर्व रेकॉर्ड डिलिट केले जातील.
