Rain Update: पुढील 24 तास महत्त्वाचे… पुण्यासह या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ एप्रिल ।। गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळीचे ढग दिसत आहेत. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने काल हजेरी लावलीये. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होतंय. हेच नाही तर काल अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण देखील बघायला मिळाले. ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढताना दिसतंय. हवामान खात्याकडून आज अनेक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलीये. हेच नाही तर ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलाय. सध्या राज्यात पावसाला पोषक असे वातावरण हे बघायला मिळतंय.

वादळी वाऱ्यासह गारपिटीचा हवामान खात्याकडून इशारा
आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना येथे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज देण्यात आलाय. याशिवायही काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात इतर ठिकाणी आज कमाल तापमानात मोठी वाढ देखील होईल. काल मुंबईमध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. मुंबई शहर आणि उपनगरात संध्याकाळी आणि रात्री आकाश साधारणपणे ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह हलका पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुमे 34 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुळात म्हणजे होळीनंतर हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे.

अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्ये गारपिटीचा इशारा
काल मुंबईमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले आणि आज हवामान खात्याकडून हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. पुण्यात देखील पाऊस होण्याचा अंदाजा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. लातूरमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. कोकणात सध्या सामान्य हवामान राहिल. मंगळवारी चंद्रपूरच्या ब्रह्यपुरीत उच्चांकी तापमानाची नोंद झालीये. सध्या राज्याच्या अनेक भागांवर चक्राकर वारे वाहत असल्याने अवकाळीचे संकट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *