Gold Price Today: ५५ ते ६० हजार चे सगळे अंदाज फोल ठरवत सोन्याची उच्चांकी उसळी, पहा प्रतितोळा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ एप्रिल ।। अमेरिका-चीन या दोन जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सुरु असलेल्या व्यापार तणाव आणि जागतिक भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांनी विक्रमी भरारी घेतली आहे. मंदीची भीती आणि जागतिक अनिश्चितीततेमुळे लोकं सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धावत आहेत, त्यामुळे मौल्यवान धातूची मागणी आणि किमती वाढत आहेत. गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर सोन्यात मोठी वाढ झाली असून देशात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर 1,00,000 रुपयांच्या विक्रमी पातळीच्या जवळ आला आहे.

सोनं स्वस्ताईचं स्वप्न भंगलं
लग्नसराईच्या हंगामाआधी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्याला आज मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांआधी एक अहवाल समोर आला होता ज्यांवर सोनं 55,000 रुपयांपर्यंत स्वस्त होण्याचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्याही खरेदीच्या अपेक्षा बळावल्या पण, ट्रम्प यांनी शुल्कात 90 दिवसांची सवलत दिल्यानंतर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. एका झटक्यात सोन्याच्या दरात 2913 रुपयांची वाढ झाली आणि सोन्यानं 93,074 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला.

सराफा बाजारात सोन्याला सोन्याचा भाव
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बुधवारी सोन्याच्या किमतीत एका दिवसात 100 डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली, जी सर्वात मोठी एकदिवसीय वाढ होती. त्यानंतर गेल्या दोन्ही दिवसांत सोन्याचा भाव सतत वाढत राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2.80% वाढून प्रति औंस 3,172 डॉलरवर व्यवहार करत आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.

त्याचवेळी, आदल्या दिवशी सकाळी सोन्याच्या किमतीत 3,000 रुपयांची वाढ झाली आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर 1,00,000 रुपयांच्या विक्रमी पातळीपासून 6,500 रुपये दूर आहे. गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर सोन्यात मोठी वाढ झाली असून देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्याचा भाव 93,300 रुपयांवर तर, चांदीची किंमत 97,100 रुपये झाली आहे. अशा स्थितीत, खरेदी करण्यासाठी जास्त खिसा रिकामा करावा लागेल तर आधीच गुंतवणूक केलेले आता फक्त पैसे मोजत असतील.

दिल्ली-मुंबईमध्ये सोन्याचा दर
शहराचे नाव 22 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली 85,760 93,540
चेन्नई 85,610 93,390
मुंबई 85,610 93,390
कोलकाता 85,610 93,390

सोन्याच्या दरात तेजीचे कारण काय
चीन-अमेरिकेतील वाढत्या व्यापारयुद्ध आणि नवीन आयात शुल्काच्या वणव्यात सोन्याच्या किमती नरमले होत्या पण, दोन्ही देशांमधील व्यापारयुद्ध आणखी गडद होताना आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या पुन्हा किमती वाढू लागल्या आहेत. ज्याचा परिणाम भारतातही दिसून येत असून इथेही सोन्याचे भाव दररोज बदलत आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती जागतिक दर, टॅक्स, आयात शुल्क आणि रुपयाच्या मूल्यावर अवलंबून असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *