महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ एप्रिल ।। दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील अस ट्विट मनसेचे नेते राजू पाटील यांनी केलं आहे. हे ट्विट करत असताना भिडे गुरुजींच्या श्वान दंशाचा आधार पाटील यांनी दिला असला तरी नेटकऱ्यांनी मात्र मंगळवारच्या राज्यातील घडलेल्या सर्वात मोठ्या राजकीय भेटीचा आधार दिला आहे. त्यामुळे सध्या पाटील यांनी केलेल्या ट्विटने राज्यात चर्चेला उधाण आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजू पाटील यांच्या ट्विटने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. नुकतच शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांना श्वानांनी दंश केला आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत. त्यातच मंगळवारी एका राजकीय भेटीच्या बातम्या प्रसार माध्यमांवर सुरु झाल्या होत्या.
दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो , बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील….!
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 15, 2025
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या निवास स्थानी भेट झाली होती. यावेळी माध्यमांवर शिंदें सह त्यांच्या सहकाऱ्यांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था केल्याचे देखील म्हटले जात होते. तेवढ्यात मनसेचे नेते व कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी एक्सवर केलेल्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पाटील यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांकडून देखील खास मिश्किल भाषेत समाचार घेतला जात आहे.