सत्यम ज्वेलर्स पिंपरी -चिंचवड परिसरातील एक विश्वासार्ह आणि पारंपरिक नाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। सत्यम ज्वेलर्स मागील ४२ वर्षांपासून ग्राहकांच्या मनात आपल्या दर्जेदार दागिन्यांनी आणि पारंपरिकतेने विशेष स्थान मिळवत आले आहे. आता सत्यम ज्वेलर्स एका नव्या युगाची सुरुवात करत आहे. येत्या २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, निगडी येथील त्यांचा नूतनीकरण केलेला भव्य दालनाच्या ग्राहकांसाठी खुले होणार आहे. हे केवळ दालनाचे नूतनीकरण नसून, आधुनिक दृष्टीकोन, सुंदर रचना आणि एक अद्वितीय ब्राइडल ज्वेलरी अनुभव यांचे प्रतीक ठरणार आहे.

या वाटचालीत सत्यम ज्वेलर्सने स्थानिक ग्राहकांबरोबर एक मजबूत नातं तयार केलं आहे. चार दशके म्हणजे दोन पिढ्या – ज्या घरात आईने सत्यमकडून दागिने घेतले, तिथे आज त्यांची मुलगी देखील आपल्या लग्नासाठी त्याच ठिकाणी खरेदीसाठी येत आहे, ही केवळ खरेदी नाही, तर ही परंपरा, विश्वासाची आणि भावनिकतेची मजबूत बंध आहे.

सत्यम ज्वेलर्सचे तीन भव्य दालने आहेत – निगडी, कृष्णानगर आणि चाकण. या तिन्ही ठिकाणी मिळणारी सेवा, नवं-नवीन डिझाइन्स आणि खरेदीचा संपूर्ण अनुभव हे त्यांच्या यशाचे खरे कारण आहे. नवीन निगडी चे दालन हे केवळ भव्यतेसाठीच नाही, तर त्यांच्या आधुनिक व पारंपरिक दागिन्यांसाठी विशेष आहे. पहिल्यांदाच पीसीएमसीमध्ये ब्राइडल लाउंज सादर केला जात आहे – एक खास, शांत आणि सौंदर्यपूर्ण जागा जिथे नववधू आपल्या आयुष्याच्या सुंदर क्षणासाठी योग्य दागिन्यांची निवड करू शकेल.

या लाउंजमध्ये आणि शोरूममध्ये सादर करण्यात आलेल्या कलेक्शन्समध्ये राजवाडी, पोल्की, अँटिक आणि टेम्पल ज्वेलरी प्रमुख आहेत. राजवाडी ज्वेलरीमध्ये शाही रचना, नाजूक कोरीव काम, आणि पारंपरिकतेचा उत्तम नमुना आहे. पोल्की ज्वेलरी पारंपरिक आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण दर्शवते.
अँटिक ज्वेलरीमध्ये जुन्या काळाच्या आठवणी, दागिन्यांचा वारसा आणि मौल्यवान संस्कृतीची अनुभूती मिळते. टेम्पल ज्वेलरी हा भारताच्या अध्यात्मिकतेचा आणि सौंदर्यशास्त्राचा प्रतीक आहे देवतांच्या रूपातील डिझाइन्स, घटकांचे विवरण आणि पारंपरिक डिझाइन्समुळे ती खास आहे.

याशिवाय, आजच्या तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लाइटवेट, फ्यूजन आणि आधुनिक ज्वेलरी देखील येथे उपलब्ध आहे. महिलांसाठी ऑफिस वियरपासून ते खास प्रसंगांसाठी उपयुक्त अशा संपूर्ण डायमंड कलेक्शनमध्ये सॉलिटेअर रिंग्स, पार्टी वियर नेकलेसेस आणि खास कपल्ससाठी डिझाइन केलेल्या रिंग्स उपलब्ध आहेत. सोबतच, “Satyam Silver” हा चांदीसाठी खास विभाग आहे – जिथे पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंपासून ते खास भेटवस्तूंपर्यंत सगळं काही आहे.

ग्राहकांचे बदलणारी आवड, वाढलेली गुणवत्ता जाण आणि अनुभवाकडे असलेली ओढ लक्षात घेता, सत्यम ज्वेलर्सने त्यांच्या दृष्टीकोनात नवा बदल केला आहे. आज ग्राहक केवळ सोनं किंवा डायमंड विकत घेत नाही, तर ते त्या अनुभवाची, त्या क्षणाची आणि त्या परंपरेची किंमत देतात. त्यामुळेच ‘सत्यम ज्वेलर्स’ यांचे नवीन दालन हे केवळ एक विक्री केंद्र नाही – तर ते एक अनुभव आहे, एक उत्सव आहे.

दालनाची रचना आणि डिझाइन देखील याच तत्वांवर आधारित आहे. ग्राहक जेव्हा आत पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांना एक शांत, कलात्मक आणि स्वागतार्ह वातावरण जाणवते. ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शनत, दागिन्यांची निवड आणि विविध दागिन्यांच्या शैलीनुसार विभाग असलेले हे शोरूम त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने एक ‘स्टायलिश अनुभव’ ठरतो.

या भव्य उद्घाटनाच्या निमित्ताने २० आणि २१ एप्रिल २०२५ या दिवशी सत्यम ज्वेलर्स सर्व ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या प्रवासाचा भाग होण्यासाठी त्यांनी दोन खास ऑफर्स देखील जाहीर केल्या आहेत: सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट २०% सूट तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट ५०% सूट आणि ‘जितकं सोनं, तितकी चांदी’ – सोनं खरेदी करताना त्याच वजनाची चांदी मोफत. या ऑफर्स सर्व शोरूम्समध्ये (निगडी, कृष्णानगर, चाकण ) ५ मे २०२५ पर्यंत वैध राहणार आहेत.

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर, सत्यम ज्वेलर्सच्या या नव्या ब्राइडल कलेक्शन्समध्ये प्रत्येक वधूला तिच्या स्वप्नातील दागिने मिळतील – जे तिच्या सौंदर्यात भर घालतीलच, पण तिच्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतीक ठरतील. काही क्षण असतात जे चित्रात साठवले जातात, काही आठवणीत राहतात – आणि काही दागिन्यांच्या रूपाने जपले जातात. सत्यम ज्वेलर्स हे क्षण जपण्यासाठी, त्या आठवणींना दागिन्याच्या रूपात साकार करण्यासाठी तुमचं स्वागत करतं.

या नव्या युगात, सत्यम ज्वेलर्स केवळ ब्रँड नसून एक भावनिक बंध आहे – ज्याने दोन पिढ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे आणि आता नव्या पिढीसाठी नव्या जोमाने सज्ज झाला आहे. आपल्या प्रत्येक भेटीला, प्रत्येक खरेदीला आणि प्रत्येक दागिन्याला अर्थ देणारे हे ठिकाण – पुन्हा एकदा सज्ज आहे, तुमचं स्वागत करण्यासाठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *