Maharashtra Politics: काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार? विधानसभेतील पराभवा मुळे थोपटे भाजपवासी होण्याची चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे. तर त्याचा हादरा काँग्रेससोबतच शरद पवारांनाही बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचा दिग्गज नेता भाजपच्या गळाला लागलाय. मात्र हा नेता कोण आहे? हे आपण स्पेशल रिपोर्टमधून पाहणार आहोत.

राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागलीये. थोपटेच्या या निर्णयानं राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच काँग्रेसलाही धक्का बसलाय.

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. तीन वेळा ते भोरमधून काँग्रेसचे आमदार राहिले. वडील अनंतराव थोपटे ६ वेळा भोरमधून काँग्रेस आमदार राहिले होते. ते राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत. विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचा पराभव झाला होता.

भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद होता. मात्र यावेळी लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळेंना घरातून सुनेत्रा पवारांचे आव्हान आल्यानं शरद पवारांनी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला मुठमाती दिली. थोपटेंच्या घरी जाऊन त्यांनी नवी राजकीय समीकरणं जुळवून आणली.परिणामी सुप्रिया सुळेंना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं. त्यामुळे थोपटेंचं भोरमधील वर्चस्व कायम होतं. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन एकाच वेळी शरद पवार आणि काँग्रेसला धोबीपछाड देण्यास भाजप यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

संग्राम थोपटेंनी मात्र अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही..त्यंाच्या अडचणीत आलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. मात्र लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंचं काम केल्याने अजित पवारांनी हे मार्जिन मनी लोन रद्द केलं. त्यातच विधानसभेतील पराभव झाल्यामुळे थोपटे भाजपवासी होण्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *