महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वॉशिंग्टन – दि. २३ ऑगस्ट – चीन आणि अमेरिकेचे संबंध दिवसेंदिवस बिघाड असल्याचे चित्र आहे. भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केल्यानंतर अमेरिकेनेही कडक भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने चीन कंपनी असलेल्या टीकटॉकवर बंदी घातली होती. आता, अमेरिकेच्या संसदेत चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या संदर्भात नवे विधेयक मांडले गेले आहे. लवकरच यावर जोरदरा चर्चा होणार आहे. हे विधेयक म्हणजे शी जिनपींग यांना चीनचे राष्ट्रपती न मानण्यासंदर्भातील आहे. शत्रु अधिनियम अंतर्गत लवकरच अमेरिका सरकारच्या कुठल्याही दस्तावेजमध्ये जिनपींग यांचा नामोल्लेख राष्ट्रपती नसवा असे आहे.
वॉशिंग्टनमधील संसदेत चीनचे प्रमुख नेते शी जिनपींग यांचा उल्लेख करण्याच्या प्रकारात बदलण्याचे विधेयक मांडले आहे. जिनपींग या उल्लेख चीनचे प्रमुख नेते, पिपल्स लिबरेशन आर्मीचे अध्यक्ष आणि कम्युनिष्ट पक्षाचे महासचिव असा केला जातो. त्यामध्ये, कुठेही राष्ट्रपती असे पद किंवा उल्लेख नाही. त्यामुळे चीनच्या प्रमुख नेत्याला राष्ट्रपती न संबोधण्याचे वॉशिंग्टनमधील संसदेत मांडलेल्या विधेयकात म्हटले आहे.
रिपब्लिक पक्षाचे खासदार स्कॉट पेरी यांनी हे विधेयक मांडले आहे. ते म्हणतात की, जनतेतून निवडूण आलेल्या नेत्यांसाठी राष्ट्रपती हा शब्द वापरला जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह इतरही इंग्रजी बोलणाऱ्या देशांचे प्रमुख शी जीनपींग यांचा उल्लेख राष्ट्रपती असाच करतात. चीनच्या प्रमुख नेत्यास राष्ट्रपती म्हणणे म्हणजे आपल्या देशातील नागरिकांनी त्यांची लोकशाही मार्गाने निवड केली आहे, अशी धारणा बनते. त्यामुळे, जनतेतून निवडून येणाऱ्या नेत्यासच राष्ट्रपती म्हटले जावे. एका प्रमुख नेत्यास राष्ट्रपती संबोधणे म्हणजे निवडूण येणाऱ्या नेत्यांस अनुचित वैधता असल्याचे दर्शवते.