स्वतःचाच पैसा काढायला देखील द्यावे लागणार पैसे ! एटीएम महागणार, बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा कापला जाणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल ।। आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही आता पैसे द्यावे लागणार आहेत. देशात डिजिटल व्यवहार वाढले असले तरी अशा व्यवहारांच्या माध्यमातून सरकार थेट तुमच्या खिशात हात घालत असल्याचे समोर आले आहे. येत्या 1 मेपासून नियमात बदल होणार असून दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढणे, मोजणे आणि बॅलेन्स चेक करणे आता महागणार आहे. देखभाल खर्च वाढल्याने एटीएम कंपन्यांकडून होणारी मागणी लक्षात घेता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एटीएम शुल्क वाढवण्याची मागणी केली होती. त्याला आरबीआयने मंजुरी दिली.

सध्या दुसऱ्या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठ्या शहरात 5 आणि लहान शहरात 3 व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र त्याहून अधिक व्यवहार झाल्यास शुल्क आकारण्यात येत आहे. आता या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने एटीएमद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर मर्यादा ठेवावी लागेल.

ठरवून दिलेल्या मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास 17 रुपयांऐवजी 19 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर खात्यात किती पैसे आहेत हे तपासण्यासाठीचे शुल्क 7 रुपयांवरून 9 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

ग्राहकांना आता नॉन होम बँक एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा पुन्हा बॅलेन्स चेक करण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता ग्राहक आपल्याच बँकांची एटीएम सेवा वापरतील. त्यामुळे इतर बँकांच्या एटीएम सेवेला फटका बसेल.

10 वर्षांवरील मुले उघडू शकतात बँक खाते
10 वर्षांवरील अल्पवयीन मुलांना स्वतंत्ररित्या बँक खाते उघडण्याची आणि ते खाते ऑपरेट करण्याची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. अल्पवयीन मुलांना बँक खाते उघडण्याचे आणि ते स्वतः ऑपरेट करण्याबाबत जोखीम निर्माण होऊ नये यासाठी खात्यात किती पैसे ठेवता येतील याबाबत आणि इतर अटींबाबत नियम ठरवण्यात येतील. याची माहिती खातेधारक मुलांच्या पालकांना देण्यात येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *