ITR Filling 2025: इन्कम टॅक्स रिटर्न कधीपासून भरता येणार? फॉर्म 16 कधी मिळणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। नवीन आर्थिक वर्ष सुरु झालं आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करदात्यांना आयटीआर फाइल करावा लागणार आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु होते. परंतु अजूनपर्यंत आयटीआर फाइल करण्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही.परंतु येत्या काही दिवसांत आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु होईल. आयटीआर फाइल करताना कर्मचाऱ्यांकडे फॉर्म १६ असणे खूप गरजेचे आहे. दरम्यान फॉर्म 16 मिळण्याची कर्मचारी वाट पाहत आहे.

आयटीआर फाइल करण्याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु लवकरच आयटीआर फाइलिंग प्रोसेस सुरु होईल. जसे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज फॉर्म जारी करतील. त्यानंतर २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आयटीआर फाइल करु शकणार आहात.

आयटीआर फाइलिंग मे महिन्यात सुरु होईल. परंतु सॅलरीड कर्मचारी फॉर्म १६ मिळाल्यानंतरच आयटीआर फाइल करु शकतात. तोपर्यंत सॅलरीड कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ मिळेल.

फॉर्म 16 कधी मिळणार? (When Will Form 16 Get)
सॅलरीड कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म 16 हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुमच्या वर्षभराच्या सॅलरी आणि टीडीएसची माहिती असते. कंपन्यांना १५ जून२०२५ पर्यंत फॉर्म १६ देणे अनिवार्य आहे. त्यानंतर सॅलरीड कर्मचारी आयटीआर फाइल करु शकतात.

आयटीआरबाबतच्या (ITR) महत्त्वाच्या तारखा

आयटीआर फाइलिंग सुरु होण्याची संभाव्य तारीख- एप्रिल- मे २०२५ (ITR Filling Tentative Date)

फॉर्म १६ मिळण्याची अंतिम तारीख-१५ जून २०२५ (Form 16 Date)

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख-३१ जुलै २०२५ (ITR Filling Last Date)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *