Gold-Silver Price: अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याच्या दरात वाढ ?,पहा आजचा १० ग्रॅमचा भाव …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज मंगळवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २८ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २५ कॅरेट सोन्याचा दर ९५,४८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८७,५२३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९६,३८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९६४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८७,४२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,३७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,४२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,३७० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,४२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,३७० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,४२३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,३७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात  इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *