Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! एप्रिलचा हप्ता लांबणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ एप्रिल ।। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपत आला आहे. तरीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समो आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणार (Ladki Bahin Yojana Installment Delay)
लाडकी बहीण योजनेत महिना संपेपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करु, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. मात्र, आज २९ तारीख आहे.एप्रिल महिना संपायला एकच दिवस उरला आहे. अद्याप एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हा हप्तादेखील लांबणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि एप्रिलचा हप्ता एकत्र आला होता. त्यानंतर आता मे महिन्यातदेखील तसंच काहीसं होऊ शकतं. मे महिन्यात एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो.याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु एका दिवसात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणे शक्य नाही. परंतु याबाबत निर्णय होऊ शकतो.
.
या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही पैसे
लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. २१ ते ६० वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेच्या निकषात बसत नसाल तर तुमचे अर्ज बाद केले जाणार आहे. सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी सुरु आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *