Pandharpur Wari: पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; पहा पालखीचं प्रस्थान कधी?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मे ।। पावसाळा सुरु होण्यापूर्वीच वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे. यंदाचा वारी सोहळा १८ आणि १९ जूनला सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जून रोजी सुरु होईल. याच तारखेला पालखी देहूतून प्रस्थान करेल. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान १९ जून रोजी होईल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी रात्री ८ वाजता आळंदीमधून प्रस्थान करेल. रात्रीचा मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप इमारतीमध्ये होईल. दुसऱ्या दिवशी २० तारखेला आळंदीमधून पालखी निघेल. दुपारचा विसावा संगमवाडी येथे होईल तर भवानी पेठेमध्ये रात्रीचा मुक्काम होईल. शनिवारी, दि. २१ रोजी पुण्यात मुक्काम असेल. रविवारी सासवडला मुक्काम, सोमवारीही पालखी सासवडमध्येच असेल. मंगळवार,दि. २४ रोजी जेजुरीमध्ये मुक्काम असेल.

पुढे वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असं करत ५ जुलै पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल. ६ तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगरप्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल. पुढे १० जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच असेल.

संत तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक
बुधवार, दि. १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पालखीचं प्रस्थान होईल. रात्रीचा मुक्काम इनामदार साहेब वाडा येथे होईल. दि. १९ रोजी देहूतून पालखी निघेल. तर आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम होईल. २० जून रोजी आकुर्डी, एच.ए. कॉलनी, कासारवाडी, दापोडी, छत्रपती शिवाजी नगर, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर फर्ग्युसन रोड असं करत रात्रीचा मुक्काम नानापेठ येथील विठ्ठल मंदिरामध्ये होईल.

२१ जून रोजी संपूर्ण दिवस श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे येथे आणि मुक्कामही येथेच होईल. दि. २२ रोजी लोणी काळभोर, दि. २३ यवत तसेच पुढे वरवंड, उडंवडी गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी असं करत शनिवार, दि. ५ जुलै रोजी पालखी पंढरपूमध्ये दाखल होईल. ६ तारखेला आषाढी एकदशीला चंद्रभागा स्नान आणि पांडुरंग दर्शन होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *