सोन्या , चांदीचा भाव परत कमी ,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २५ ऑगस्ट -सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा भाव 236 रुपयांनी घसरला. त्यामुळे MCXवर सोन्याचा दर 51,780 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचा भाव 860 रुपयांनी कमी झाला असून चांदीचा भाव 66,207 रुपये प्रति किलो इतका आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरांचा नवा रेकॉर्ड होऊ शकतो. जेपी मॉर्गनच्या एका रिपोर्टनुसार, आर्थिक परिस्थिती, कोरोना महामारी आणि राजकीय परिस्थिती पाहता दिवाळीपर्यंत सोनं 70 हजार रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.कोरोना काळात गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीकडे कल वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्था तसंच शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोनं ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *