महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे ।। भारत -पाकिस्तानातील युद्धसदृष्य़ परिस्थिती सध्या निवळली आहे. मात्र तरीही भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आहे. याच पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगोने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन्ही विमान कंपन्यांनी मंगळवारी काही शहरांना जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, चंदीगड आणि राजकोटसह काही शहरांमधील उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे. एअर इंडियानेही सोशल मीडियाद्वारे उड्डाण रद्द करण्याबाबत माहिती दिली आहे.
इंडिगोने एक्सवरील फ्लाइट रद्द करण्याबाबत एक पोस्ट शेअर केली. “तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. 13 मे रोजी जम्मू, अमृतसर, चंदीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोट येथून येणाऱ्या विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे तुमच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो. मात्र आमची टीम या निर्णयावर विचार करत आहे. आम्ही लवकरच तुम्हाला अधीक माहिती देऊ, असे त्यानी पोस्टमध्ये म्हंटले आहे.