नांदेड पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत लिबगाव गटांमध्ये एकूण 53 जनावरांचे गोठे मंजूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – दि. २६ ऑगस्ट – जिल्ह्यातील लिबगाव सर्कल त्यामध्ये वाघी -2 सुगाव खु -2 सुगाव बुद्रुक -2 पोखरणी 3-तीन पिंपरी महिपाल -3 राहाठी-10 पिंपळगाव कोरका-2 तळणी -5 लिबगाव- 7 कोटीतीर्थ -6 सोमेश्वर-3-जैतापूर-2 बोरगाव -4 यामध्ये कुशल रक्कम एका गोठ्यासाठी- 51 हजार रुपये तर अकुशल साठी -19000 असी एकूण रक्कम -70000 हजार एका गोठ्या साठी देण्यात येत असून 53 गोठे चे काम करण्याकरिता 4231 मनुष्य दिवस कामाला लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गोठा मिळणार तर लिबगाव गटातिल 8 ते 9 गावात रोजगार उपलब्ध झाला असून या कामाला एकूण 3710000( 37 लक्ष दहा हजार निधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या कामाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे,नांदेड पंचायत समितीच्या सभापती कावेरी ताई वाघमारे उपसभापती राजू हटकर व नांदेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत तोटावाड व प .स .चे विस्तार अधिकारी श्री जीवन कांबळे , MRGS APO भालेराव मॅडम शाखा अभियंता श्री कांबळे यांचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे नांदेड पंचायत समिती अंतर्गत काम उत्कृष्ट पद्धतीने होत असून नांदेड जिल्हा परिषदेचे आदरणीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटील साहेब यांनी देखील यामध्ये विशेष लक्ष घातले शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार आता गाव पातळीवर रोजगार हमी च्या अंतर्गत एकूण 254 कामे करण्याचा शासन निर्णय आला असून या माध्यमात सुद्धा काम विकास करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत नांदेड पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य मिळून जनतेसाठी काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे श्री.साहेबराव धनगे जि प सदस्य यांनी प्रतिनिधीना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *