हगवणे पिता-पुत्रास आश्रय देणाऱ्या पाच आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे ।। सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल तिचे नवरा आणि सासू-सासऱ्यांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिचा सासरा आणि अजित पवार गटाचे बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) 7 दिवस फरार होता. यादरम्यान त्याला काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यांनी आश्रय दिला. त्यामुळे आता हगवणे पिता-पुत्रास आश्रय देणाऱ्या पाच आरोपींना पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राजेंद्र हगवणेंना आसरा देणारे कोण आहे प्रीतम वीरकुमार पाटील?
प्रीतम विरकुमार पाटील हे कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरकुमार पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. विरकुमार पाटील यांना दोन मुलगे आणि दोन मुली आहेत.कला शाखेचे पदवीधर असणारे प्रीतम यांना जातिवंत घोडे पाळण्याचा आणि कारचा शौक आहे. त्यांच्याकडे जातिवंत घोडे असून अत्यंत आधुनिक वेगवेगळ्या कार्स त्यांच्याकडे आहेत.प्रीतम हे माजी तालुका पंचायत सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रीतम हे कार्यकर्ते आहेत. गावातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. तरुण पिढीत प्रीतम हे लोकप्रिय आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती-
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता. त्यामुळे राजेंद्र हगवणेंच्या या प्रवासावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही?, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच राजेंद्र हगवणे 22 मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आलं आहे.

राजेंद्र हगवणे 7 दिवसांत कुठे कुठे फिरला?
17 मे-

– औंध हॉस्पिटल
– मुहूर्त लॉन्स (थार गाडीने)
– वडगाव मावळ
– पवना डॅम (फार्म हाऊस)
– आळंदी येथे लॉजवर

18 मे-

– वडगाव मावळ
– पवना डॅम (बंडू फाटक कडे बलेनो गाडीने)

19 मे-

– पुसेगाव ( सातारा) अमोल जाधव यांच्या शेतावर

19 मे आणि 20 मे-

पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज)

21 मे-

कोगनोळी ( प्रीतम पाटील यां मित्र्याच्या शेतावर)

22 मे-

पुण्याला परत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *