महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। गेल्या काही दिवसांपासून राज्या सह शहरात पावसाला सुरू झाली. शनिवार ,रविवार आणि सोमवारी पावसानेअक्षरशः धुमशान घातले. आज पावसाचा जोर ओसरला. परंतु, साथीचे आजार पसरल्याची शक्यता आहे. सर्दी , खोकला आणि तापाच्या साथीच्या आजार वाढण्याची शक्यता आहे. दवाखान्यांमध्ये, रुग्णालयांच्या ओपीडीत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, टायफॉईडच्या रुग्णांची गर्दी पावसाळा सुरु झाला कि दिसून येते .
वादळी वाऱयासह आलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक चौकात येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी भरले. गुडघाभर पाण्यातून चाकरमान्यांना वाट काढत इच्छित स्थळ गाठावी लागली. सगळीकडे चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले. लोकांच्या घरात गटाराचे पाणी गेले. हे पाणी आता ओसरले असले तरी साथीचे आजार मोठय़ा प्रमाणावर पसरण्याची शक्यता आहे .
लहान मुलांना सांभाळा
विविध ठिकाणी सखल भागात, झोपडपट्टय़ांमध्ये, चाळींमध्ये गटाराचे पाणी शिरले. अनेक ठिकाणी अजूनही चिखल आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना सर्वाधिक सर्दी, खोकला, तापाचा संसर्ग होऊ शकतो. तापाची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डेंग्यू, मलेरिया, कावीळ अशा आजारांचा संसर्गही लहान मुलांना होऊ शकते .