जगाच्या विनाशाची मोठ्या पडद्यावर मांडणी : येणार पूर, दुष्काळ, चक्रीवादळं…. चिंताजनक आकडेवारी समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। World on High Alert : ‘2012’ हा हॉलिवूड चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटामध्ये जगाचा अंत झाला, तर तो नेमका कसा असेल, परिस्थिती किती भीषण असेल आणि नेमकं हे चित्र किती वाईट होऊ शकतं यावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता. की झाली जगाच्या विनाशाची मोठ्या पडद्यावर करण्यात आलेली मांडणी. मुळात फक्त चित्रपटच नव्हे तर या जगाच्या विनाशाची सुरुवात नेमकी कशी होईल यावर उजेड टाकणारे काही सिद्धांतसुद्धा मांडण्यात आले आणि नुकतीच एका अहवालातून समोर आलेलीय आकडेवारी पाहता याची प्रचितीसुद्धा येत आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.

पृथ्वीच्या तापमानात वाढ…
संपूर्ण जगभरात येत्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढ ही समस्या आणखी भीषण होणार असून, साऱ्यांचीच होरपळ होणार आहे. मुख्य म्हणते ही वाढणारी उष्णताच मानवी अस्तित्वाला धोक्याची ठरू शकते. ज्या धर्तीवर या जीवघेण्या उष्णतेसाठी तयार राहा असा स्पष्ट इशारा जागतिक हवामान संघटना आणि ब्रिटनच्या हवामान विभागानं देत सावध केलं आहे.

2025 ते 2029 या वर्षांमध्ये पृथ्वीच्या तापमानात 1.5 टक्क्यांनी वाढ होणार असून, ही शक्यता आता 70 टक्क्यांनी वाढली आहे. ज्यामुळं उष्णतेचा हा काळ आता अटळ असून त्याची शक्यता 80 टक्क्यांवर पोहोचल्याचं जागतिक संघटनांनी सांगितलं आहे. वरील पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी सरासरी तापमानापेक्षा पृथ्वीचं तापमान प्रत्यक्षात औद्योगिकीकरणापूर्वीच्या तापमान सरासरीहून साधारण 1.2 ते 1.9 टक्के जास्त असेल.

तापमानात ही लक्षणीय वाढ झााल्यास नेमकं काय होणार?
पृथ्वीचं एकूण तापमान 1.5 अंशाहून अधिक वाढलं तर त्याचा संपूर्ण जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होणार असून, जगभरातील सर्वच देशांन या हवामान बदलांचा मारा सोसावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊन उष्माघातानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढेल. वनसंपदा पाण्याअभावी लयास जाऊन, जलसाठे कोरडेठाक पडण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे.

जागतिक तापमानवाढीमुळं हिमनग वितळून त्यामुळं समुद्राची पातळी वाढेल. पृथ्वीवरील काही भागांमध्ये पूर येतील, कुठं दुष्काळ पडेल तर कुठं सततच्या चक्रीवादळसदृश्य परिस्थितीमुळं मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्ताची हानी होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

फक्त पूर आणि दुष्काळच नव्हे, तर जगभरातील वनसंपदा वणव्यात होरपळून नष्ट होईल. समुद्रकिनाऱ्यानजीक असणारा बहुतांश भाह जलमय होऊन काही शहरं नष्ट होण्याची भीतीसुद्धा व्य़क्त केली जात आहे. दरम्यानच्या काळात शहरंच्या शहरं विस्थापित होऊन मोठी वस्ती निर्मनुष्यसुद्धा होईल. हवामान बदलांचे थेट परिणाम हे अन्नधान्य उत्पादनावर होऊन प्रचंड दरवाढ नागरिकांना उपासमारीच्या दिशेनं नेण्यास कारणीभूत ठरेल. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार या बदलांचा सर्वाधिक परिणाम विकसनशील आणि गरीब देशांवर होणार असून, असंख्य लोक या संकटामुळं प्रभावित होतील अशा इशारा देत जगाच्या विध्वंसाकडे जागतिक संघटनांनी लक्ष वेधलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *