Vaishnavi Hagawane : वैष्णवीला मारहाणीचे व्हिडिओ असण्याची शक्यता, हगवणे मायलेकीचे मोबाईल नीलेशकडून लंपास?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। ‘वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर पळून गेलेला सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांनी तिची सासू लता व नणंद करिश्माचे मोबाइल नीलेश चव्हाणच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाइलमध्ये शशांकने वैष्णवीला मारहाण केल्याचे व्हिडिओ किंवा आरोपींच्या संभाषणाचे पुरावे असण्याची शक्यता असून, लता, करिश्मा व सुशीलच्या मोबाइलचा शोध घ्यायचा आहे,’ अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात दिली.

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। ‘वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर पळून गेलेला सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांनी तिची सासू लता व नणंद करिश्माचे मोबाइल नीलेश चव्हाणच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाइलमध्ये शशांकने वैष्णवीला मारहाण केल्याचे व्हिडिओ किंवा आरोपींच्या संभाषणाचे पुरावे असण्याची शक्यता असून, लता, करिश्मा व सुशीलच्या मोबाइलचा शोध घ्यायचा आहे,’ अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात दिली.

अटकेत असलेला वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३) व दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७, सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपी शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीत एक दिवस; तसेच राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.

सर्वांचे सोने गहाण
‘या प्रकरणात फरारी आरोपी नीलेश चव्हाणचा शोध घ्यायचा आहे. लता, करिश्मा व सुशील यांचा मोबाइल मिळवून, नीलेश व सुशील यांच्यामध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले संभाषण मिळवायचे आहे. वैष्णवीसह हगवणे कुटुंबीयांनी त्यांचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले आहेत. वैष्णवीचे दागिने गहाण ठेवून कोणाच्या नावाने कर्ज काढले, अशा विविध मुद्द्यांवर तपास करायचा आहे. शशांकने वैष्णवीच्या मृत्यूच्या पाच व तीन दिवस अगोदर तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केली आहे. ही हत्यारे जप्त करायची आहेत. त्यासाठी पती शशांक, सासू लता व नणंद करिश्माच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची, तर सासरा राजेंद्र व दीर सुशीलच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करावी,’ अशी मागणी तपास अधिकारी अनिल विभुते व सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केली.

‘पत्नीला मारणे छळ नव्हे’
आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावे केले. ‘हा हुंडाबळीचा प्रकार नसून, वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबीयांनाही न्याय हवा आहे. वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होते. त्याचा नुकताच साखरपुडा झाला असून, तो तिला टाळत होता. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात आला. त्यामुळे ती तणावात, नैराश्यात होती. तिची आत्महत्येची मानसिकता होती. तिने एकदा उंदीर मारण्याचे औषध घेऊन; तसेच गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. ती चॅटिंग करीत असलेल्या व्यक्तीचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला नाही.’ असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला.

‘घराची प्रगती व व्यावसायिक गरजेसाठी हगवणे कुटुंबातील सर्वांनीच सोने गहाण ठेवले असून, गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशीच त्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पतीने पत्नीला चार कानाखाली मारणे हा छळ नसल्याचे निवाडे न्यायालयांनी दिले आहेत. घरातील प्लास्टिक पाइपला हत्यार म्हटले जात आहे. हगवणेंच्या घरात पाच कोटी रुपयांच्या गाड्या असताना चाळीस लाख रुपयांच्या ‘फॉर्च्युनर’साठी छळ कसा होईल? या प्रकरणी मीडिया ट्रायल सुरू असून, आरोपींच्या पोलिस कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही,’ असा युक्तिवाद ॲड. दुशिंग यांनी केला.
हुंडा घेणारा कळवा, ५ हजार रुपये मिळवा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नवी मुंबईत पोस्टरबाजी

या प्रकरणाच्या ‘एफआयआर’मध्ये नीलेश चव्हाणचे नाव नसून, त्याने बाळ सांभाळायचे धाडस दाखवले आहे. तरीही त्याच्यावर बाल न्याय कायदा व हगवणेंचा नातेवाइक नसतानाही हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल करता आला असता,’ असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *