महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार आहे. ईपीएफओ लवकरच आपला अपग्रेडेड प्लॅटफॉर्म EPFO 3.0 लाँच करणार आहे. याची तयारी सुरु केली आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये EPFO 3.0 लाँच होईल. याबाबत केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली होती. ईपीएफओचा नवीन प्लॅटफॉर्म मे किंवा जून महिन्यात लाँच होऊ शकतो. याचा फायदा तब्बल ९ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. आज आम्ही तुम्हाला EPFO 3.0 बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
ईपीएफओ 3.0 काय आहे?
ईपीएफओ 3.0 (EPFO 3.0) हा एक प्लॅटफॉर्म आहे. ईपीएफओने आयटी इन्फ्रास्टक्चर अपग्रेड केले आहे. यामुळे ईपीओफओ कर्मचाऱ्यांना ऑटो क्लेम सेटलमेंट, डिजिटल अकाउंट करेक्श आणि एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. या नवीन ईपीएफओ 3.0 व्हर्जनमुळे पीएफ क्लेम मान्य झाल्यावर तुम्ही एटीएममधून हे पैसे काढू शकणार आहे.
एटीएममधून काढता येणार पीएफचे पैसे (PF Withdrawl Through ATM)
एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा लवकरच सुरु होणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना ईपीएफ ऑफिसमध्ये जाऊन काही काम असेल तर करावे लागत होतो. आता तुम्हाला क्लेमबाबत सर्व माहिती मोबाईलवर मिळणार आहे. त्याचसोबत तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. यामुळे क्लेम अप्रुव होण्यासाठी लागणारा कालावधी कमी होणार आहे. आयटी इन्फ्रास्टक्चर अपग्रेड झाल्यानंतर तुमचे काम खूप जलद होणार आहे.
ईपीएफचे पैसे एटीएममधून काढणे ही सुविधा खूप चांगली आह. परंतु एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. हे अपग्रेडेड व्हर्जन नवीन असणार आहे त्यामुळे एटीएममधून पीएफ काढता काळजी घ्यायची आहे. एटीएममधून पीएफ काढण्याची प्रोसेस कशी असणार आहे याबाबत लवकरच अधिकृत माहिती देणार आहेत.