Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Horoscope Today दि. ७ फेब्रुवारी २०२६ ; काही वेळेस शांत राहणे उत्तम ठरेल...…….. ..; पहा बारा राशींचं भविष्य — - Maharashtra 24

Horoscope Today दि. ७ फेब्रुवारी २०२६ ; काही वेळेस शांत राहणे उत्तम ठरेल……….. ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी |७ दि. ७ फेब्रुवारी २०२६ | |

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)
गैरसमज फार ताणू नयेत. लहानांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा. काही गोष्टींना विरोध होवू शकतो. उत्साहाच्या भरात सारासार विचाराला बाजूस सारू नये. मुलांची स्वतंत्र वृत्ती लक्षात घ्यावी.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)
स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे. काही वेळेस शांत राहणे उत्तम ठरेल. कौटुंबिक शांततेला मह्त्व द्यावे. काही गोष्टींची ओढाताण जाणवेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)
पराक्रमाला चांगला वाव मिळेल. मित्रांची मदत घ्याल. वादात अडकू नये. साहसाने कामे हाती घ्याल. प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)
कामातून चांगली प्राप्ती होईल. काही कामात अधिक कष्ट पडतील. आवडी-निवडी वर अधिक भर द्याल. कौटुंबिक प्रश्न भेडसावतील. खर्चाचे योग्य नियोजन कराल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)
मानसिक स्थैर्य जपावे. चिडचिड टाळावी लागेल. पित्त विकार जाणवतील. व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. श्रमामुळे थकवा जाणवेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)
महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. स्त्रीवर्गापासून दूर राहावे. चुकीच्या कामात हात घालू नये. वाद-विवादापासून लांब रहा.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)
नवीन मित्र जोडाल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन गोष्टी शिकून घ्या. ओळखीचा सुयोग्य फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)
कामाच्यावेळी इतर विचार बाजूला सारावेत. कलेतून आर्थिक फायदा संभवतो. धार्मिक कामात मदत कराल. कामातील बदलाकडे सकारात्मकतेने पाहावे. दगदग जाणवेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)
वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. प्रवासात सतर्क राहावे. मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेवू नयेत. वडीलधा-यांचा मान राखावा. मदतीला धावून जाल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)
सद्य स्थितीचा विचार करावा. तब्येतीची हेळसांड करू नका. तुमच्यातील समजूतदारपणा दाखवावा. क्षुल्लक गोष्टींवर अडून राहू नका. चिंता करत बसू नये.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)
भागीदारीत प्रगतीला वाव आहे. तुमचा जनसंपर्क वाढीस लागेल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)
आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची मदत मिळेल. फसवणुकीपासून सावध रहावे. हाताखालील कामगारांवर लक्ष ठेवा. वेळेचे योग्य नियोजन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *