महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २६ ऑगस्ट – देशातील प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली खासगी गाड्यांची संख्या यासाठी कारणीभूत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा चांगल्या प्रकारे देणं आवश्यक आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरातून वाहतुकीच्या खर्चात बचत करता येईल. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीतही घट होईल, असं सांगत रिन्यूएबल एनर्जी आणि इलेक्ट्रीक कार या विषयांवर गडकरी यांनी जोर दिला.