NEET Exam : नीट’ परीक्षेने घाम फोडला; ‘एमबीबीएस’ प्रवेशाचा ‘कटऑफ’ घसरणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होणे हे स्वप्न… त्या स्वप्नासाठी ‘नीट’ ही एकमेव वाट आहे. मात्र, वर्षागणीक ‘नीट’ परीक्षेचा कठीणपणा वाढत चालला आहे. पेपरची काठिण्य पातळी, परीक्षेचा दर्जा, प्रश्नांची जटिलता, यामुळे 2025 मध्ये झालेल्या ‘नीट’ परीक्षेने केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर पालकांचाही यंदा घाम फोडल्याचे दिसून आले आहे. यामुळे राज्यस्तरावर 600 च्या वर गुण मिळवणार्‍यांची संख्या खूपच कमी असेल; परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी ‘कटऑफ’ मर्यादा सुमारे 500 ते 510 गुणांवर स्थिरावेल. ती गेल्यावर्षी 620 होती.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) मे महिन्यात देशभरात एकाच सत्रात ‘नीट’ परीक्षा घेतली. या परीक्षेत 22.70 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यंदा भौतिकशास्त्राचा पेपर अधिकच अवघड होता, अशी एकमुखी प्रतिक्रिया परीक्षार्थींतून उमटली आहे.

बीडची वेदिका म्हणते, यावर्षी फिजिक्स पेपर खूप गोंधळात टाकणारा होता. मागील वर्षीपेक्षा अवघड होता. काही प्रश्न असे होते की, त्यांचा सराव मी कधीच केला नव्हता. यामुळे मला पेपरच पूर्ण करता आला नाही. ही माझी ‘नीट’ची दुसरी वेळ होती. जीवशास्त्रातदेखील काही प्रश्न गोंधळात टाकणारे होते.

राज्यात 3 लाखांवर विद्यार्थी ‘नीट’ देतात. त्या तुलनेत राज्यभरात ‘नीट’ गुणांवरील महाविद्यालयांतील प्रवेशाच्या जागा

अभ्यासक्रम संस्था जागा

एमबीबीएस 53 7,324

बीडीएस 29 2,675

बीएएमएस 105 7,857

बीएचएमएस 57 4,594

बीयूएमएस 3 83

बीपीटीएच 83 4,280

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *