RBI MPC: RBI सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करणार? ; EMI किती कमी होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जून ।। सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करू शकते. महागाई दर सध्या सरासरी 4% पेक्षा कमी असल्याने रेपो दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफ-संबंधित निर्णयांमुळे जागतिक अनिश्चितता कायम आहे. 4 जूनपासून रिझर्व्ह बँकेची समिती या विषयावर चर्चा करेल आणि 6 जून रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल.

महागाई दर 6 टक्क्यांपर्यंत खाली येईल
RBI ने फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 मध्ये दोनदा रेपो दर 0.25% ने कमी केला आहे. त्यानंतर तो 6.5 टक्क्यांवरून 6% वर आला आहे. फेब्रुवारी 2025 पासून रेपो दरात एकूण 0.50% कपात केल्यानंतर, बहुतेक बँकांनी त्यांचे कर्ज दर ग्राहकांसाठी कमी केले आहेत.

तिसऱ्यांदा रेपो दरात कपात होण्याची अपेक्षा
बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, आरबीआयच्या निर्णयांमुळे महागाई दर आणि तरलतेत घट झाल्यामुळे, एमपीसी तिसऱ्यांदा रेपो दरात 0.25% कपात करू शकते. त्यांनी अशी आशा देखील व्यक्त केली की, आरबीआय जागतिक वातावरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल याचे विश्लेषण करेल.

महागाई दर 4% च्या खाली राहण्याची अपेक्षा
आयसीआरएच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर म्हणाल्या की ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आर्थिक वर्षात 4% च्या खाली राहण्याची अपेक्षा आहे. यामुळेच चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

नायर म्हणाल्या की, पुढील आठवड्यात रेपो दरात 0.25% कपात होण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यांत आणखीन दोनदा कपात केली जाऊ शकते. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस रेपो दर 5.25% पर्यंत खाली येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *