महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २६ ऑगस्ट – लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवण्यात आली आहेत असा आरोप होतोय. सरासरी प्रमाणे पाठवलेली मोठाली वीजबिले आल्याने अनेकांची दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झालीये. दरम्यान आज तरी वाढीव वीजबिलांवर तोडगा निघतो का हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत आज तरी वाढीव वीज बिलांवर चर्चा होतेय का आणि या प्रकरणी तोडगा निघणार का असा प्रश्न आता विचारला जातोय.
सरकारकडून याबाबत माहिती देण्यात येतेय की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतची चर्चा होणार आहे. वाढीव वीजबिलांचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत वीजबिलांवर दिलासा दिला जाऊ शकतो का याबाबत चर्चा केली जाणार होती. दरम्यान या प्रस्तावावर अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र आता प्रस्ताव तयार असल्याने आणि आज मंत्रिमंडळ बैठक पार पडत असल्याने आज तरी या विषयवार कॅबिनेटमध्ये चर्चा होतेय का हे पाहावं लागेल.
आज होणारी गणपतीच्या काळातील पहिली कॅबिनेट मिटिंग आहे. त्यामुळे आज तरी वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी सर्वच स्तरातून केली जातेय.
सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय की याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णयांनी घेऊ. त्यामुळे आता प्रस्तावानंतरची आजची ही पहिली मंत्रिमंडळ बैठक आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होतेय का आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.