महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जून ।। ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील आणि आपण, नुकतीच बंद दाराआड चर्चा झाली..! या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही तुमची बातमी आहे. ती AI ची बैठक होती. या बैठकीमध्ये बोर्डाने चर्चा केली. त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, जयंत पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सर्व त्या बैठकीला उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही बैठक होती. असे उत्तर अजित पवारांनी यावेळी दिले.
भविष्यात दोन्ही पवार एकत्र येतील का..! यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माझ्या मुलाच्या साखरपुड्याला सर्व पवार कुटुंब एकत्रित आले होते. कौटुंबिक कार्यक्रम असेल तर आम्ही सर्व एकत्रित असतो. आमची राजकीय विचारधारा वेगवेगळे आहे. मात्र कुटुंब सुखा दु:खात एकत्रित असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अर्थ खात्यात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कशाला घोटाळा करेल..! आपण लाडकी बहीण योजनेसाठी प्रथम अर्ज मागवले होते. त्यावेळेस सर्वांना पात्रतेचे निकष सांगितले होते. त्यावेळी वेळ कमी होता. अनेकांनी अर्ज भरले होते. अलीकडे काही शासकीय महिलांनीही फॉर्म भरल्याचे लक्षात आले. हे निकषात बसत नसणाऱ्या महिलांना वगळण्याचे काम सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, लाडक्या बहिणी योजनेसाठी इतर वेगवेगळ्या खात्याचा निधी वळवला जात असल्याची टीका होत आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारमध्ये जो निर्णय घेतला जातो. कॅबिनेटमध्ये घेतला जातो. त्या निर्णयाला विधिमंडळाची बहुमताने मान्यता असते.