![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून ।। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वेने दोन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनला परवानगी दिली आहे. या सुपरफास्ट एक्सप्रेस पुण्याला जोडल्या जाणार आहे. त्यामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या सुपरफास्ट एक्सप्रेस पुणे, गोंदिया, रेवा, जबलपूर, रायपूरशी जोडल्या जाणार आहेत.रेवा ते पुणे आणि जबलपूर- रायपूर या नवीन एक्सप्रेस ट्रेन असणार आहे. (New Superfast Express Train)
या दोन सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.ही नवीन रेल्वो सेवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
यातील एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेवा-गोंदिया-पुणे या मार्गावर धावेल. तर दुसरी एक्सप्रेस जबलपूर-रायपूर या मार्गावर धावेल. रेल्वे कनेक्टिव्हिटीचा पाठपुरवठा केल्यानंतर या एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा केली आहे.
नवीन एक्सप्रेसचे रेल्वे मार्ग (New Superfast Express Route)
रेवा-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस रेवा-सतना-जबलपूर-नैनपूर-बालाघाट-गोंदिया-नागपूर-पुणे या मार्गाने प्रवास करेल.
जबलपूर-रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस जबलपूर-नैनपूर-बालाघाट-गोंदिया-रायपूर या मार्गाने धावणार आहे.
या दोन नवीन एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांना एकमेकांना जोडण्यात येईल. यामुळे गोंदिया, नागपूर, पुण्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे.
