महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जून ।।
मेष राशिभविष्य (Aries Horoscope )
जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. वडीलांशी खटके उडू शकतात.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope )
आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पटवून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मनातील चिंतेला आवर घाला. कामात अधिकार्यांचा सल्ला मिळेल. कागदपत्रांची योग्य जुळवणी करावी लागेल. मनात काही गैरसमज उत्पन्न होऊ शकतात. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope )
विसंवादाचे कारण उकरून काढू नका. मुलांवरील खर्च वाढू शकतो. भागीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. प्रेम वीरांनी नसते साहस करू नये.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कामे मन लावून करणे गरजेचे आहे. व्यावसायिक स्पर्धेत सावधान रहा. धार्मिक कार्याचा आनंद घ्याल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक फायद्यावर लक्ष केन्द्रित राहील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope )
मुलांबाबत चिंता निर्माण होईल. आजचा दिवस कष्टात जाईल. स्वातंत्र्यप्रिय विचार कराल. कौटुंबिक सौख्याकडे दुर्लक्ष करू नका. चुकीच्या संगतीत अडकू नका.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope )
प्रेमप्रकरणाला कलाटणी लागू शकते. उगाच राईचा पर्वत केला जाईल असे होऊ देवू नका. कामाव्यतिरिक्त इतर भानगडी निस्तराव्या लागतील. वेळेचा अपव्यय टाळावा. वैवाहिक जीवनात ताणतणाव राहील.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
महत्वाकांक्षेच्या जोरावर कामे हाती घ्याल. छोट्याश्या अपयशाने खचून जाऊ नका. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. जोडीदाराशी मनमोकळा वार्तालाप करावा.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
बिनधास्तपणे वागून चालणार नाही. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. वयोवृद्धानी आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन कामात अधिक कष्ट पडतील. लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. अती हटवादीपणा चालणार नाही. महत्वाकांक्षेला योग्य वळण द्यावे. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope )
मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. तांत्रिक बाजूंचा नीट अभ्यास करावा. स्थावर संबंधीचे प्रश्न उद्भवू शकतात. हातातील अधिकाराची जाणीव ठेवा. कोर्टाची कामे निघू शकतील.