काळ आला होता पण … गणपती बाप्पामुळे वाचले.: ट्रॅफिकमध्ये फसली अन् अपघातग्रस्त विमान सुटलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जून ।। अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत २४२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पण विमान दुर्घटनेत एका महिलेचा जीव चक्क लेट झाल्यामुळे वाचला. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, याचीच प्रचिती तिला आली आहे. विमान दुपारी पैकी फक्त एकच प्रवासी महिला वाचली आहे. तिचे नाव भूमि चौहान असे आहे. दुपारी १.३८ वाजता विमानाने अहमदाबादवरून उड्डान घेतलं अन् अवघ्या काही मिनिटात कोसळलं. याच विमानातून भूमि चौहान लंडनला जाणार होत्या, पण विमानतळावर पोहचण्यासाठी उशिर झाला अन् विमान हुकलं. विमान हुकल्यामुळेच भूमि चौहान यांचा जीव वाचला.

मी गणपती बाप्पामुळे वाचली –
या दुर्दैवी घटनेमधून भूमि चौहान यांचा चमत्कारिकपणे जीव वाचला. भूमि चौहान या अहमदाबादवरून लंडनला परत निघाल्या होत्या. पण प्रचंड वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहचण्यासाठी दहा मिनिटं उशिर झाला. त्यामुळे फ्लाइट AI-171 मध्ये चढण्याची परवानगी मिळाली नाही. या उशिरामुळे त्यांचा जीव वाचला. “मी गणपती बाप्पाची आभारी आहे. त्यांनी मला वाचवले,” असे भावुक होत भूमि यांनी सांगितले. “त्या 10 मिनिटांच्या उशिरामुळे मी त्या विमानात चढू शकले नाही. हे अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे,” असे भूमि यांनी सांगितले.

भूमि चौहान दोन वर्षांनंतर भारतात आल्या होत्या. त्या एकट्याच लंडनला परतत निघाल्या होत्या. पण १० मिनिटांनी उशिर जाला अन् विमान हुकलं. पण त्याच विमानाची दुर्घटना घडली. विमान कोसळल्याची बातमी ऐकून भूमि यांना धक्का बसला, शरीर थरथरत होते. “दुर्घटनेची बातमी ऐकून माझा विश्वासच बसला नाही. माझे मन पूर्णपणे सुन्न झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.

२४२ जणांचा मृत्यू –
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे उड्डाण करणाऱ्या एअर इंडियाच्या बोइंग 787 ड्रीमलाइनर (फ्लाइट AI-171) विमानाचा उड्डाणानंतर काही मिनिटांतच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २४२ जणांचा मृत्यू झाला असून, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या भयंकर अपघातात फक्त एकच प्रवासी, ४० वर्षीय ब्रिटिश नागरिक विश्वाश कुमार रमेश, थोडक्यात बचावला. त्याच्यावर सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *