महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जून ।। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १० क्रू मेंबर्स, २ पायलट यांच्यासह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच मेघाणीनगर परिसरात कोसळले आणि भीषण स्फोट झाला. इतका भयानक होता की, विमानाचे लोखंडदेखील वितळले, आणि प्रवाशांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. पण या सगळ्यात चमत्कारी गोष्ट समोर आली आहे. शोधकार्यादरम्यान, बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून, वाचनीय स्थितीत होती.
बचावपथकाला शोधकार्यदरम्यान भगवद्गीता सापडली. कदाचित कुणीतरी प्रवासी अहमदाबादहून लंडनला हा पवित्र ग्रंथ घेऊन जात असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यांमधून भगवद्गीता काढत आहे. तसेच गीतेची पाने दाखवताना दिसत आहे. अपघातस्थळी सगळं काही जळून राख झालं आहे. पण भगवद्गीतेला काहीच झालेलं दिसत नाही आहे.
A passenger aboard the ill-fated AirIndia flight was carrying a copy of the Bhagavad Gita. In a remarkable turn, the sacred book was found intact and unharmed amidst the wreckage at the crash site. 🙏 pic.twitter.com/VBu4jYuvIi
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) June 13, 2025
सध्या याचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी चमत्कार असे कमेंट करून आश्चर्य व्यक्त केला आहे. दरम्यान, अपघातानंतर लंडनमधील एका हिंदू मंदिरात सुमारे १०० लोक जमले होते. त्यांनी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि शोकाकुल कुटुंबासाठी प्रार्थना केली आहे.