महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जून ।। प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. या गुंतवणूकीमुळे तुम्हाला भविष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही. तुम्ही नेहमी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा. सरकारी योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. कमीत कमी गुंतवणूकीत चांगला परतावा दिला जातो. यासाठीच केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरु केली आहे.
अटल पेन्शन योजनेत तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक करायची असते. या योजनेत तुम्हाला जबरदस्त रिटर्न मिळणार आहे. अटल पेन्शन योजनेत तुम्ही १००० ते ५००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. या योजनेत तुम्ही जेवढी गुंतवणूक करता त्यावर तुमच्या पेन्शनची रक्कम अवलंबून असते. या योजनेत तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळते.
अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळते.
या योजनेत तुम्हाला कमीत कमी २० वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही ४० वर्षांचे असाल तर आतापासून गुंतवणूक करायची आहे. या योजनेत जर तुम्ही १८ वर्षांपासून गुंतवणूक केली तर तुम्हाला ५००० रुपयांची महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्ही रोज फक्त ७ रुपयांची गुंतवणूक करायची आहे.त्यानंतर तुम्हाला ५००० रुपये मिळणार आहेत. जर तुम्हाला महिन्याला १००० रुपयांची पेन्शन हवी असेल तर महिन्याला ४२ रुपये गुंतवावे लागणार आहे.
अटल पेन्शन योजनेत पती पत्नी दोन्ही मिळून १० हजार रुपये मिळवू शकतात. या योजनेत पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन मिळणार आहे.
अटल पेन्शन योजनेत फक्त पेन्शन नाही तर इतर अनेक सुविधा मिळतात. या योजनेत तुम्हाला १.५ लाखांपर्यंत टॅक्स वाचवता येणार आहे. आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सूट मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.