Maharashtra Weather : राज्यात या ठिकाणांना मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा : IMD चा डबल अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जून ।। मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे, त्याशिवाय पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांसाठी राज्यात आयएमडीने डबल अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसासोबतच समुद्रात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात, घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा जारी केला आहे. यामुळे मच्छिमारांना आणि लहान होड्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी पुणे घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढला आहे. कोकणातील नदीकाठ आणि डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन प्रवास टाळावा, असेही सुचवण्यात आले आहे. (Orange and red alert issued for heavy rain in Pune ghats)

कोकण किनारपट्टीवर पुढील आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये २१ आणि २२ जूनला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या घाट परिसरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

पावसाचा जोर कायम – (Heavy rain to continue in Maharashtra for next 48 hours)
पुण्यातही मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासन सतर्क आहे. कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील, तर विदर्भात तुरळक पाऊस पडेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *