महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून ।। वेस्ट इंडीजविरुद्ध येत्या २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबूशेन याला वगळले आहे. तर बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्टीव स्मिथ या सामन्यात खेळू शकणार नाही.
या दोन बदलांमुळे ऑस्ट्रेलियाची नवी मधली फळी पहिल्या सामन्यात खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि लाबूशेन ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीचे आधारस्तंभ होते.
लाबूशेनऐवजी कॉन्टासला संधी देण्यात आलली आहे. तर स्मिथऐवजी जॉश इंग्लिस खेळेले. भारताविरुद्धच्या कसोटीत कॉन्टासला खेळवण्यात आले होते त्याने ६५ चेंडूंत ६० धावांची खेळी केली होती. गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे इंग्लिसने कसोटी पदार्पणात शतकी खेळी साकार केली होती.